Home ब्रेकिंग न्यूज म्यानमारमध्ये इमारतीत स्फोट, ४५ ठार

म्यानमारमध्ये इमारतीत स्फोट, ४५ ठार

0
म्यानमारमध्ये इमारतीत स्फोट, ४५ ठार
myanmar

म्यानमार : म्यानमारमधील नामखाम टाऊनशिपमधील काउंटुप येथे एका इमारतीत दुपारी स्फोट झाला. या स्फोटात ४५ जणांचा मृत्यू झाला आणि ७० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोट झाला ते ठिकाण चीनच्या सीमेपासून तीन किमी. अंतरावर आहे. हा भाग ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मीच्या नियंत्रणात आहे. येथील स्थानिक आणि म्यानमारमधील सत्ताधारी यांच्यात हिंसक संघर्ष सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटाचा आवाज काही किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीत खाणकामामध्ये वापरण्यात येणारी स्फोटके ठेवण्यात आली होती, अशी माहिती स्थानिकांपैकी काही नागरिकांनी दिली.

https://prahaar.in/2026/05/31/ipl-final-2026-gujarat-bowled-out-for-155-runs-rcb-set-a-target-of-156-runs/

स्फोटाची माहिती मिळताच थोड्या वेळाने घटनास्थळी मदतीसाठी सरकारी यंत्रणा पोहोचली. या पथकाला घटनास्थळावरच ४५ मृतदेह आढळले. या सर्वांचा स्फोटात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत ७४ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here