Home क्रीडा India A Squad Update : भारत अ संघात मोठा बदल! रियान पराग दुखापतीमुळे बाहेर; ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी एन्ट्री

India A Squad Update : भारत अ संघात मोठा बदल! रियान पराग दुखापतीमुळे बाहेर; ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी एन्ट्री

0
India A Squad Update : भारत अ संघात मोठा बदल! रियान पराग दुखापतीमुळे बाहेर; ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी एन्ट्री

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेपूर्वी India A (भारत अ) संघात मोठे बदल केले आहेत. संघाचा उपकर्णधार रियान पराग दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ऋतुराजला थेट उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.

दुखापतीमुळे रियान पराग संघातून बाहेर

आयपीएल 2026 दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा रियान पराग हॅमस्ट्रिंग (पोटरी) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेत होणाऱ्या महत्त्वाच्या तिरंगी मालिकेत संघात त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/05/31/satwik-chirag-pair-win-singapore-open-title/

ऋतुराज गायकवाडची उपकर्णधार म्हणून निवड

रियानच्या अनुपस्थितीत निवड समितीने अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऋतुराजला केवळ संघात स्थानच मिळाले नाही, तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आता तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी भारत A संघाचे नेतृत्व करणार आहे.

वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष

या संघात 15 वर्षीय युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही समावेश करण्यात आले आहे. आयपीएल २०२६ मधील धडाकेबाज खेळीनंतर आता त्याला India A संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर प्रियांश आर्य, आयुष बडोनी, निशांत सिंधू आणि प्रभसिमरन सिंह यांसारखे युवा खेळाडूही संघात संधी देण्यात आली आहे.

तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

9 जून – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ

11 जून – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ

13 जून – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ

15 जून – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ

17 जून – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ

19 जून – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ

21 जून – अंतिम सामना

भारत अ संघ (वनडे तिरंगी मालिका)

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here