Home महाराष्ट्र अहिल्यानगर Accidental News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू…

Accidental News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू…

0
Accidental News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू…

Shirdi-Nashik Highway : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे जाणारी एसटी बस नियमित प्रवासी वाहतूक करत होती. त्याचवेळी नाशिकच्या दिशेने जाणारी एर्टिगा कार सावळीविहीर परिसरातून जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचा चेंदामेंदा झाला.

दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बस आणि कारमधील मिळून सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. काही जखमींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत तरा काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

https://prahaar.in/2026/05/31/new-twist-in-kedgaon-sex-determination-case-dr-sundaram-kadam-of-uruli-kanchan-in-trouble/

पोलिसांकडून तातडीने बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी पोलिसांच्या व्हॅनचा वापर करण्यात आला. सर्वांना शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर शिर्डी-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. शिर्डी-नाशिक महामार्गावरील या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here