Home महाराष्ट्र नाशिक Nashik : बारा बंगला फिल्टरेशन प्लांटचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे, आमदार देवयानी फरांदे यांचे आदेश

Nashik : बारा बंगला फिल्टरेशन प्लांटचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे, आमदार देवयानी फरांदे यांचे आदेश

0
Nashik : बारा बंगला फिल्टरेशन प्लांटचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे, आमदार देवयानी फरांदे यांचे आदेश

नाशिक : शहरातील (Nashik ) प्रभाग क्रमांक ७, १२ व १३ या भागांना पुरेसा व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गंगापूर धरणातून पाणी बारा बंगला येथे आणून अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सन २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही काम पूर्णत्वास जात नसल्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी बारा बंगला येथील फिल्टरेशन प्लांटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना काम तातडीने पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले. यावेळी त्यांनी कामाची गती वाढवून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीदेखील काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे धारणकर यांनी पुढील तीन दिवस हे काम दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येईल तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत फिल्टरेशन प्लांट (Filtration plant) पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

https://prahaar.in/2026/05/30/nashik-65-year-old-farmer-murdered-over-land-dispute/

या पाहणी दौऱ्यावेळी माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक बबलू शेलार, शहर अभियंता अग्रवाल, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता गणेश मैद, निकम तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रकल्प अधिकारी आशिष सूर्यवंशी व नवीन पाटेकर हेही उपस्थित होते.सदर फिल्टरेशन प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर प्रभाग ७, १२ व १३ मधील हजारो नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here