– कुवेतमध्ये हाय अलर्ट
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Iran – America War) पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून, मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच अमेरिकेने इराणमधील अब्बास पोर्ट परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/28/neet-paper-leak-2026-indian-army-now-helping-for-neet-exam-security-central-government-preparing-to-take-big-decision-to-prevent-malpractices/
संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित :
इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू झाल्यानंतर कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीचे निवेदन जारी केले. त्यानुसार, कुवेतच्या हवाई क्षेत्राच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/28/mistreatment-of-indians-in-us-threatened-saying-get-out-of-our-country/
IRGC चा अमेरिकेला थेट इशारा :
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनीही इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर रात्रीभर कारवाया सुरू असल्याचे मान्य केले आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकन नौदल आणि व्यापारी जहाजांसाठी धोका ठरणाऱ्या इराणी तळांवर लक्ष्य साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/27/america-to-withdraw-us-navy-to-pull-back-from-iran-will-the-blockade-of-the-strait-of-hormuz-come-to-an-end/
या वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले सुरू केले होते. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. यामध्ये इस्रायल, यूएई आणि कुवेतसह अनेक देशांवर हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. (Iran – America War)