अक्कलकोटमधील धक्कादायक घटना; विहिरीत उडी घेत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू…
Crime News : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
सासरकडून सतत छळ होत होता; आईचा आरोप
या घटनेनंतर भाग्यश्रीच्या आई कलव्वा बसप्पा पुजारी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि कौटुंबिक छळ केला जात होता. असा गंभीर आरोप भाग्यश्रीच्या आईने केला आहे. तक्रारीमध्ये पती, सासू, सासरे, दोन दीर, नणंद आणि इतर नातेवाईकांसह एकूण सात जणांवर आरोप करण्यात आला आहेत. कौटुंबिक वाद आणि सततच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
https://prahaar.in/2026/05/28/neet-paper-leak-2026-indian-army-now-helping-for-neet-exam-security-central-government-preparing-to-take-big-decision-to-prevent-malpractices/
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस अधिक तपास करत आहेत, मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.