Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याघटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी तरुणीने आपल्या भावाला पाठवलेल्या मेसेजमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. भावाच्या दिलेल्या माहितीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.
IT कंपनीत नोकरी,पण प्रेमात आयुष्य उद्ध्वस्त?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. तिचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वीच तिने कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगितले होते. दोघे लवकरच लग्न करणार होते. मात्र कुटुंबीयांनीही या नात्याला विरोध केला नव्हता.
https://prahaar.in/2026/05/28/pimpri-chinchwad-lover-assaults-girlfriend-in-clothes-shop-cctv-video-viral/
त्याने माझा वापर केला…
मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीने आपल्या भावाला मेसेज करून प्रियकराने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला. त्याने माझा वापर करून मला विसरून जाण्यास सांगितलं, असं तिने मेसेजमध्ये म्हटलं होतं. या घटनेनंतर ती तीव्र मानसिक तणावाखाली गेल्याचं कुटुंबीयांनी सांगितले.
मुठा नदीत सापडला मृतदेह
काही दिवसांनी खराडी पोलिसांकडून कुटुंबीयांना फोन आला आणि मुठा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. ओळख पटवल्यानंतर मृतदेह संबंधित तरुणीचाच असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
https://prahaar.in/2026/05/28/beed-crime-immoral-relationship-between-stepmother-and-son/
प्रियकराविरोधात गंभीर आरोप
तरुणीच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, प्रियकराच्या फसवणुकीमुळेच बहिणीने आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोप केला आहे. पोलिस आता संबंधित तरुणाच्या भूमिकेची चौकशी करत आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधातून बाहेर पडता आलं नाही…
कुटुंबीयांनी अनेकदा समजावून सांगूनही तरुणीला प्रेमसंबंधातून बाहेर पडता आले नाही. या घटनेमुळे तरुणांमधील भावनिक तणाव, रिलेशनशिपमधील फसवणूक आणि मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.