Home महाराष्ट्र कोकण Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

0
Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निधी राकेश उतेकर ही १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे गावी आली होती. निधी ही विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.सोमवारी (२५ मे) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी रात्रीभर तिचा शोध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले.

जंगलात सापडला मृतदेह, शरीरावर जखमांचे निशाण

निर्जन जंगलभागात सापडलेल्या मृतदेहावरील जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानेही घटनास्थळी तपास सुरू केला असून परिसरातील पुरावे गोळा करण्यात येत आहेत.दरम्यान, निधीचा मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणामागील धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/27/government-committed-to-the-welfare-of-fishermen-minister-nitesh-rane/

या घटनेमुळे माणगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here