मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवा पसरत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Petrol Diesel Stock in Maharashtra)
https://prahaar.in/2026/05/26/maharashtra-vidhan-parishad-elections-2026-excitement-over-seat-sharing-in-mahayuti-bjps-moves-accelerate-to-address-shindes-displeasure/
या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील सर्व तेल कंपन्यांकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच विनाकारण घबराट निर्माण करून अतिरिक्त इंधन खरेदी करणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Petrol Diesel Stock in Maharashtra)
https://prahaar.in/2026/05/25/siddhivinayak-temple-beautification-project-will-give-the-surrounding-area-a-new-look/
दरम्यान, प्रशासनाकडूनही पेट्रोल पंप चालकांना योग्य प्रमाणात इंधन वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. (Petrol Diesel Stock in Maharashtra)
सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर आता नागरिकांमधील संभ्रम दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.