Home ब्रेकिंग न्यूज Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि…, रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि…, रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

0
Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि…, रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात मध्यरात्री अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ जीप अनियंत्रित झाली आणि सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात जीपमध्ये बसलेल्या आठ तरुणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि मदत पथके यांनी दरीत उतरून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. हे मदतकार्य आता पूर्ण झाले आहे. रेस्क्यू टीमने दरीतील धक्कादायक स्थितीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली त्यावेळी ऐकणारे स्तब्ध झाले.

https://prahaar.in/2026/05/25/accident-at-ambenali-ghat-8-youths-die-as-scorpio-falls-into-700-feet-ravine/

मध्यरात्री २.४५ च्या सुमारास आंबेनळी घाटातून जात असताना स्कॉर्पिओ जीप अनियंत्रित झाली आणि सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात जीपमध्ये बसलेल्या आठ तरुणांचा मृत्यू झाला. सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगावचे रहिवासी होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला २०१८ मध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच परिसरात हा अपघात झाला.

https://prahaar.in/2026/05/25/neelam-shirke-withdraws-from-all-india-marathi-film-corporation-elections/

आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. वाहन दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने वाहनापर्यंत पोहोचणे आणि परिस्थितीचा अंदाज घेणे मध्यरात्रीच्या वेळी कठीण होते. सुरुवातीला प्रखर प्रकाशाचे टॉर्च वापरून मदतकार्य सुरू करण्यात आले. पहाटे सुरू झालेले मदतकार्य रात्री संपले. शेवटचा मृतदेह सोमवारी २५ मे २०२६ रोजी रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी दरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया झाल्यानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जातील. सोमवारी रात्री उशिरा पर्यंत मृतदेह सातारा जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/05/25/plan-transportation-considering-the-increasing-number-of-tourists-in-sindhudurg/

रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार दरीत चक्काचूर झालेली स्कॉर्पिओ जीप आढळली. पाच मृतदेह जिथे स्कॉर्पिओ जीप आढळली त्याच भागात आढळले तर इतर तीन मृतदेह हे दरीत आणखी काही फूट खाली आढळले. गाडी जोरात दरीत कोसळली. वाहनाला मोठा धक्का बसला. यामुळे वाहनातील तीन तरुण बाहेर फेकले गेले आणि दरीत आणखी खाली कोसळले.

मृत तरुणांची नावं : महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५), नितीन किसन नायकोंडे (३५)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here