Home ब्रेकिंग न्यूज Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

0
Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (ट्युशन एरिया) परिसरातील उत्पादन व्यवसायाव्यतिरिक्त सुरू असलेले सर्व अनधिकृत व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/05/23/maoist-arms-manufacturing-factory-dismantled-in-gadchiroli/

गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसी परिसरात नियमांना हरताळ फासत खासगी ट्युशन क्लासेस, हॉस्टेल्स, वसतिगृहे, खानावळी तसेच विविध कमर्शियल कार्यालयांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता. औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आलेल्या परिसराचे हळूहळू “एज्युकेशन हब”मध्ये रूपांतर झाल्याची चर्चा होती. आता मात्र जिल्हा उद्योग केंद्राने स्पष्ट भूमिका घेत “उत्पादन व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यवसाय चालणार नाही,” असा इशारा दिला आहे.

https://prahaar.in/2026/05/23/journey-of-sais-shirdi-from-devotion-to-artillery/

स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर बांधकामे तसेच नीट पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेला दबाव यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

https://prahaar.in/2026/05/23/maharashtra-hsc-marksheet-date-big-update-for-class-12-students-original-marksheet-will-be-available-from-25-may/

या कारवाईमुळे एमआयडीस परिसरात वर्षानुवर्षे शिक्षण व संबंधित व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल करणारे अनेक व्यावसायिक प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

हॉस्टेल व्यवसाय, खानावळी, भाडेव्यवसाय आणि कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा असून, आता या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यावसायिक व्यवस्थांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रशासनाने स्पष्ट इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अनधिकृत व्यवसाय त्वरित बंद करून आदेशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

लातूर एमआयडीस परिसरात नेमके कोणते व्यवसाय सुरू होते, त्यांना कोणाचे पाठबळ होते आणि पुढील कारवाईची दिशा काय असेल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here