Home देश Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद

0
Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद
Cockroach Janata Party

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनंतर आता पक्षाचे अधिकृत संकेतस्थळही बंद करण्यात आले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना पक्षात सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र, अचानक वेबसाईट बंद झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (Cockroach Janata Party) सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. एक्स आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स जोडले गेले होते. अनेक तरुण या चळवळीशी जोडले जात असल्याचे दिसत होते. पण आधी एक्स अकाऊंट, त्यानंतर इन्स्टा पेज आणि आता वेबसाईट बंद झाल्याने संबंधित यंत्रणांकडून सलग कारवाई होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

https://prahaar.in/2026/05/23/karnataka-road-accident-death-toll-in-kalaburagi-5-members-of-a-family-killed-in-speeding-truck-collision/

या घडामोडींनंतर पक्षाचे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दिपके काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील अकाऊंट्स बंद झाल्यानंतर काही समर्थकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच, कोणतीही निदर्शने झाल्यास त्याच्याशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, अभिजीत दिपके आणि त्यांच्या पक्षाविषयी वाढत्या उत्सुकतेमुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुढील काही दिवस दिपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. (Cockroach Janata Party)

https://prahaar.in/2026/05/23/40000-jobs-in-shipbuilding-sector-by-2030-minister-nitesh-rane/

‘कॉक्रोच जनता पार्टी’भोवती (Cockroach Janata Party) निर्माण झालेलं गूढ, सोशल मीडियावरील झपाट्याने वाढलेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेल्या सलग कारवायांमुळे हा विषय आता राज्यासह देशभरात चर्चेचा बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here