Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमध्ये लाचखोर तलाठ्याचा हायव्होल्टेज ड्रामा, लाचेचे पैसे गाडीबाहेर फेकले

Nashik : नाशिकमध्ये लाचखोर तलाठ्याचा हायव्होल्टेज ड्रामा, लाचेचे पैसे गाडीबाहेर फेकले

0
Nashik : नाशिकमध्ये लाचखोर तलाठ्याचा हायव्होल्टेज ड्रामा, लाचेचे पैसे गाडीबाहेर फेकले

नाशिक :नाशिक जिल्हातील देवळा तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्याने पाच हजाराची लाच मागितली होती. घटनेची माहिती मिळताच लाच घेणाऱ्या तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे कारवाईनंतर संशयित तलाठ्याला शासकीय वाहनातून नेले जात असताना त्याने चक्क खिशातील लाचेची रक्कम (bribe) गाडीबाहेर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

खामखेडा येथे तलाठी वर्ग – ३ म्हणून कार्यरत असलेला तलाठी पप्पू काशिनाथ सोनकांबळे (४६, आहेर मळा, आहेर वस्ती, कळवण रोड, देवळा) आणि मजूर प्रशांत दावल सोनवणे (२४, खामखेडा, देवळा) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराची खामखेडा शिवारात जमीन आहे. या जमिनीवरील बहिणीचे हक्कसोड पत्रान्वये नाव कमी करण्यासाठी त्याने खामखेडा येथील तलाठी संशयित पप्पू सोनकांबळे याच्याकडे अर्ज केला होता. बहिणीच्या नावासह मूळ तक्रारदाराचे नाव देखील सात बारा उताऱ्यावरून कमी झाले. सात बारा उताऱ्यावरून नाव कमी झाल्याने तक्रारदाराने तलाठी पप्पू सोनकांबळे याला याबाबत विचारले.

त्यावेळी तलाठी पप्पू सोनकांबळे याने सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच (bribe० स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तर खासगी व्यक्ती प्रशांत सोनवणेने तक्रारदाराला तलाठी सोनकांबळे याला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तलाठी सोनकांबळे तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्याला रंगेहात पकडले. नंतर तलाठी सोनकांबळेला शासकीय वाहनात बसवले.

https://prahaar.in/2026/05/23/big-report-in-nashik-tcs-case-1500-page-chargesheet-filed-in-court/

लाचेची रक्कम गाडी बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

यावेळी मात्र तलाठ्याचा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. त्याने खिशातील लाचेची रक्कम गाडी बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तलाठी पप्पू सोनकांबळे व प्रशांत सोनवणे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस हवालदार योगेश साळवे, चेतन शेवाळे व पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता. दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी अधिकारी, कर्मचारी वा त्यांच्यावतीने कुणी खासगी व्यक्ती लाच मागत असेल तर, नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here