Home क्रीडा Ronaldo Magic! क्रिस्टियानोच्या डबल धमाक्याने अल नासर ७ वर्षांनंतर चॅम्पियन; दमैकला 4-1 ने चिरडलं

Ronaldo Magic! क्रिस्टियानोच्या डबल धमाक्याने अल नासर ७ वर्षांनंतर चॅम्पियन; दमैकला 4-1 ने चिरडलं

0
Ronaldo Magic! क्रिस्टियानोच्या डबल धमाक्याने अल नासर ७ वर्षांनंतर चॅम्पियन; दमैकला 4-1 ने चिरडलं

क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पुन्हा एकदा मोठ्या मंचावर चमकला! त्याच्या शानदार दोन गोलांच्या जोरावर Al Nassr FC ने सौदी प्रो लीग 2026 चे विजेतेपद पटकावत तब्बल 7 वर्षांची प्रतीक्षा संपवली. अंतिम सामन्यात अल नास्रने Damac FC ला 4-1 ने धूळ चारत ट्रॉफीवर नाव कोरलं.रियाधमधील अल-अव्वल पार्कमध्ये झालेल्या या निर्णायक सामन्यात रोनाल्डोने दुसऱ्या हाफमध्ये अक्षरशः वादळ निर्माण केलं. त्याने प्रथम फ्रि-किकने गोल मारला. त्यानंतर त्याने पेनॉल्टी बॉक्स मध्ये गूसून गोल मारला.त्याची फिनिशींग पाहून चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला.

7 वर्षांनंतर अल नास्रचा जल्लोष

2018-19 नंतर प्रथमच अल नास्रने सौदी प्रो लीग जिंकली आहे. विशेष म्हणजे, रोनाल्डोने क्लबमध्ये दाखल झाल्यानंतर हे त्याचं पहिलंच मोठं अधिकृत विजेतेपद ठरलं.मानेने दिली सुरुवात, कोमनने वाढवली आघाडी.सामन्याच्या 33 व्या मिनिटाला Sadio Mane याने शानदार गोल करत अल नास्रला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दमैकने पेनल्टीवर बरोबरी साधली, मात्र लगेचच Kingsley Coman याने अप्रतिम गोल करत सामना पुन्हा अल नास्रच्या बाजूने झुकवला.

रोनाल्डोचा शो… आणि सामना संपला!

यानंतर मैदानावर फक्त रोनाल्डोचाच दबदबा पाहायला मिळाला.पहिल्यांदा त्याने जबरदस्त फ्री-किकवर गोल करत चाहत्यांना वेड लावलं. त्यानंतर 81 व्या मिनिटाला कोमनच्या अचूक पासवर त्याने दुसरा गोल ठोकत दमैकच्या आशा संपवल्या. 41 वर्षांचा असूनही रोनाल्डोचा फिटनेस, आक्रमकता आणि गोल करण्याची भूक अजूनही तितकीच धोकादायक असल्याचं या सामन्यात पुन्हा दिसून आलं. एएफसी चॅम्पियन्स लीगमधील निराशेनंतर रोनाल्डोने या सामन्यात जोरदार पुनरागमन करत टीकाकारांना मैदानावरच उत्तर दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here