नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवार २३ मे ते २८ मे २०२६ दरम्यान एसबीआयच्या शाखा सलग अनेक दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आपली अत्यावश्यक बँकिंग कामे आजच पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. (SBI Close For a Week)
https://prahaar.in/2026/05/22/pune-metro-news-attention-punekars-pmt-bus-stand-in-katraj-shifted-due-to-metro-work-important-notice-for-commuters/
२३ ते २८ मेदरम्यान बँका का बंद राहणार?
२३ मे हा महिन्याचा चौथा शनिवार असून २४ मे रोजी रविवार आहे. नियमानुसार देशातील सर्व बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी बंद असतात. त्यामुळे या दोन दिवशी एसबीआयच्या शाखांमध्ये कामकाज होणार नाही. (SBI Close For a Week)
कर्मचारी संघटनांचा दोन दिवसांचा संप :
https://prahaar.in/2026/05/22/the-people-who-keep-vultures-at-home-will-also-control-cockroaches-with-a-patriotic-hit/
बकरी ईदमुळे आणखी सुट्ट्या :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बकरी ईद निमित्त विविध राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. देशातील बहुतांश भागांमध्ये २७ मे रोजी बँका बंद राहतील, तर काही राज्यांमध्ये २८ मे रोजीही सुट्टी असेल. (SBI Close For a Week)
या काळात कोणत्या सेवा सुरू राहणार?
शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी काही डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये :
– इंटरनेट बँकिंग
– मोबाइल बँकिंग
– यूपीआय व्यवहार
– एटीएम सेवा
– ऑनलाइन फंड ट्रान्सफर
– कार्ड पेमेंट सेवा
या सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र तांत्रिक अडचणी किंवा मोठ्या प्रमाणातील व्यवहारांमुळे काही सेवा संथ होऊ शकतात.
https://prahaar.in/2026/05/22/pm-modis-melody-moment-parle-companys-first-reaction-is-also-out/
कोणत्या सेवांवर होणार परिणाम ?
शाखांमधील खालील सेवा प्रभावित होऊ शकतात :
– चेक क्लिअरिंग
– रोकड जमा आणि पैसे काढणे
– पासबुक अपडेट
– डीडी आणि चेकबुक सेवा
– कर्ज व खाते संबंधित शाखा व्यवहार
– केवायसी अपडेट प्रक्रिया
त्यामुळे ग्राहकांनी शेवटच्या क्षणी अडचण टाळण्यासाठी आवश्यक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत, असा सल्ला बँकिंग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
दरम्यान, संपाबाबत अंतिम निर्णय आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक संबंधित राज्यांनुसार बदलू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या स्थानिक शाखेशी संपर्क साधून माहिती घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (SBI Close For a Week)