Home क्रीडा IND VS AFG : भारत- अफगाणिस्तान वेळपत्रकात मोठा बदल ! आता या दिवशी होणार पहिला वनडे सामना…

IND VS AFG : भारत- अफगाणिस्तान वेळपत्रकात मोठा बदल ! आता या दिवशी होणार पहिला वनडे सामना…

0
IND VS AFG : भारत- अफगाणिस्तान वेळपत्रकात मोठा बदल ! आता या दिवशी होणार पहिला वनडे सामना…

ICC : भारत अफगाणिस्तान यांच्यात आयपीएल संपल्यानंतर एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या संघाची घोषणा आणि वेळपत्रकही जाहीर केले होते. मात्र आता एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या वेळपत्रकात मोठे बदल करण्यात आले आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेची सुरुवात सहा जूनपासुन होणार आहे. या मालिकेत सहा जूनपासून एक कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना १० जूनपर्यंत खेळला जाणार आहे . यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार होती . मात्र आता पहिल्या सामन्याच्या वेळपत्रकात बदल करण्यात आले असून पहिला सामना आता १४ जून ऐवजी १३ जून ला धरमशाला येथे होणार आहे. काही कारणांमुळे हा बद्दल करण्यात आले आहे.

या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १७ जूनला लखनउच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर तीसरा सामना २० जूनला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम येथे होणार आहे. हे दोन्हीही सामने ठरलेल्या तारखेप्रमाणेच होणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिकी महत्त्वाची आहे. त्यामुळे बीसीसीआयने अनेक नव्या खेळाडुंना संधी दिली आहे. यामध्ये प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे सारख्या युवा खेळाडुंना संधी देण्यात आली आहे . तर संघाची धुरा शुभमन गीलला सोपवण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/21/icc-excitement-in-the-cricket-world-shooting-at-the-house-of-cricket-canada-president-what-is-the-real-issue/

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेचे सुधारित वेळापत्रक-
पहिला सामना – १३ जून, धरमशाला
दुसरा सामना – १७ जून, लखनऊ
तिसरा सामना – २० जून, चेन्नई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here