Home ब्रेकिंग न्यूज वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

0
वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आणि पवारांनी त्यांचे उघड कौतुक केल्यानंतर आमदार रोहित पवार भलतेच नाराज झाले आहेत. बुधवारी पक्षाच्या अंतर्गत बैठकीला दांडी मारल्यानंतर आता त्यांनी, वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन, असा इशारा आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना दिला आहे.

https://prahaar.in/2026/05/21/eknath-shindes-test-of-strength-for-2029/

रोहित पवार म्हणाले, भविष्यात जर माझ्या पक्षाने किंवा वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा अथवा विलीनीकरणाचा कोणताही निर्णय घेतला, तरी मी वैयक्तिक पातळीवर कधीही भाजपसोबत जाणार नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसरा कोणताही राजकीय पर्याय निवडण्यास प्राधान्य देऊ, पण वैचारिक तत्त्वांशी तडजोड करून भाजपच्या गोटात सामील होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here