अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक कारवाई आणखी तीव्र करत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन प्रशासनाने नव्या निर्बंधांची घोषणा करत इराणशी संबंधित एका परकीय चलन कंपनीसह तिच्या व्यापारी नेटवर्क आणि तब्बल १९ जहाजांना लक्ष्य केले आहे. या कारवाईमुळे इराणच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर आणि तेल निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/20/neet-paper-leak-neet-paper-leak-case-has-repercussions-in-vidarbha-amravati-also-on-cbi-radar/
वॉशिंग्टनच्या म्हणण्यानुसार, हे नेटवर्क केवळ इराणपुरते मर्यादित नव्हते. संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि हाँगकाँगसह अनेक देशांमध्ये त्याचे जाळे पसरले होते. विविध कंपन्या, मध्यस्थ आणि गुंतागुंतीच्या व्यावसायिक रचनांचा वापर करून इराणला जागतिक वित्तीय व्यवस्थेमध्ये प्रवेश मिळवून दिला जात होता, असा अमेरिकेचा दावा आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/20/israel-lebanon-air-strike-israel-attacks-south-lebanon-at-least-15-killed/
या निर्बंधांमध्ये १९ जहाजांचाही समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, या जहाजांचा वापर इराणचे तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादने विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी केला जात होता. ही जहाजे वेगवेगळ्या ध्वजाखाली आणि विविध कंपन्यांच्या नावाने कार्यरत होती, ज्यामुळे त्यांचा थेट संबंध लपवण्याचा प्रयत्न केला जात होता, असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/20/lahore-roads-renamed-big-change-in-lahore-many-roads-renamed-many-roads-restored-to-their-old-pre-partition-names/
दरम्यान, या नव्या कारवाईमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणकडून या निर्बंधांवर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, जागतिक तेल बाजारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आधीच वाढलेला असताना, या नव्या निर्बंधांमुळे दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Iran – America War)