Home ब्रेकिंग न्यूज Sharad Pawar and Rohit Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला रोहित पवारांची दांडी

Sharad Pawar and Rohit Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला रोहित पवारांची दांडी

0
Sharad Pawar and Rohit Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला रोहित पवारांची दांडी
Sharad Pawar And Rohit Pawar

तटकरे-पटेल भेटीमुळे नाराजीची चर्चा; शरद पवार गटात संभ्रमाचे वातावरण

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर पवारांनी केलेल्या त्यांच्या कौतुकामुळे आमदार रोहित पवार कमालीचे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नाराजीनाट्यातूनच रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी बोलावलेल्या पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याचे समोर आले आहे. ते सध्या पुण्यात असून त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

https://prahaar.in/2026/05/20/village-bomb-explodes-in-womans-hand-20-to-25-live-bombs-also-found-in-ratnagiri/

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. शरद पवार गटाकडून, विशेषतः आमदार रोहित पवारांकडून तटकरे आणि पटेल यांच्यावर सातत्याने जोरदार तोंडसूख घेतले जाते. असे असतानाही शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली आणि माध्यमांसमोर “सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोन्ही अत्यंत क्षमतावान नेते आहेत,” अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली. पवारांनी केलेले हे कौतुक रोहित पवारांच्या जिव्हारी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

https://prahaar.in/2026/05/20/has-the-time-come-for-the-distribution-of-corporations-in-the-mahayuti/

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ही बैठक विधान परिषद निवडणुका आणि आगामी काळातील पक्षाच्या धोरणात्मक रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, रोहित पवार यांनी या बैठकीला उपस्थित न राहता पुण्यातच थांबणे पसंत केल्यामुळे काका-पुतण्याच्या वादानंतर आता आजोबा-नातवामध्येही काही आलबेल नाही का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. या अनुपस्थितीनंतर आता शरद पवार नातवाची समजूत काढणार की रोहित पवार आपली भूमिका अधिक आक्रमक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाच्या इतर नेत्यांमध्येही संभ्रम

विरोधी बाकांवरून ज्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आणि पक्षफुटीचे आरोप केले गेले, त्याच नेत्यांची पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी जाहीर प्रशंसा केल्यामुळे रोहित पवारच नव्हे, तर शरद पवार गटातील इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कालपर्यंत ज्यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतली, त्यांच्याच बाबत मवाळ धोरण का, असा सूर पक्षांतर्गत उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here