– खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रक्त पेढ्यांची अर्थात ब्लड बँकची सुविधा नसल्याने आता कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, बोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय या ५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये रक्तविघटन सुविधेसह रक्तकेंद्र सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रथम दहा वर्षांसाठी आणि पुढील नुतनीकरणानंतर दहा वर्षे अशाप्रकारे एकूण ३० वर्षांकरता या रुग्णालयांमध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून रक्त पेढ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी रुग्णालयाची जागा भाडेकरारावर दिली जाणार आहे.
https://prahaar.in/2026/05/19/seven-hills-hospital-news-seven-hills-hospital-is-again-under-the-control-of-a-private-organization/
https://prahaar.in/2026/05/19/sunil-tatkare-met-the-chief-minister-devendra-fadnavis/
https://prahaar.in/2026/05/19/uttarakhand-train-accident-a-major-train-accident-was-averted-in-rishikesh-3-coaches-of-ujjain-express-derailed/
तर वांद्रे भाभा रुग्णालयातील सहाव्या मजल्यावरील २९५.०० चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा, या रक्तपेढीकरता २६.६१.१३० रुपये प्रति वर्ष चक्रेश्वर मेडिकल फाऊंडेशन यांसंस्थेला आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील ३१०.५५ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, रक्तपेढीकरता ३२,०९,७६५ रुपये प्रति वर्ष याप्रमाणे नवजीवन मेडीकल रिलीफ अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला करार केल्याच्या दिनांकापासून प्रथम दहा वर्षांकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास पुढील दहा अधिक दहा वर्षांसाठी नूतनीकरण्यासापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.