मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या दीर्घकालीन अडचणी सोडवण्यासाठी तसेच मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.
https://prahaar.in/2026/05/18/uddhav-thackeray-ubatha-chiefs-dandi-in-the-legislative-council-attendance-only-42-days-in-4-years-shameful-record-of-lowest-attendance-in-the-history-of-the-house/
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावेळी सांगितले की, रत्नागिरी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सागरी जिल्हा असून जिल्ह्याला तब्बल २३७ किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मिरकरवाडा बंदरानंतर दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला विशेष महत्त्व असून हर्णे, दाभोळ आणि बुरोंडी ही मासळी उतरविण्याची प्रमुख केंद्रे मानली जातात.
बुरोंडी हे मोठे मच्छीमार गाव असून येथे सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. गावातील नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्थेशी सुमारे २५०० हून अधिक सभासद जोडलेले आहेत. परिसरात जवळपास १०० नोंदणीकृत मासेमारी नौका असून एक आणि दोन सिलेंडरच्या छोट्या नौकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र अद्ययावत जेट्टी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थानिक मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
https://prahaar.in/2026/05/18/the-government-finally-took-responsibility-for-the-education-of-the-affected-children-in-badlapur/
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांचा आढावा तसेच विविध घटकांसाठी निधी वाटपाबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली.
बैठकीत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान(DAJGUA )योजनेअंतर्गत केंद्र… pic.twitter.com/xkXmTZz9wx
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 18, 2026
ते (Nitesh Rane) पुढे म्हणाले, “जेट्टीमुळे मच्छीमारांना मासळी थेट उतरविणे शक्य होईल. डिझेल, पाणी आणि इतर आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होईल. खराब हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यटन आणि व्यापारी हालचालींनाही चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.”
https://prahaar.in/2026/05/18/mexico-puebla-shooting-shooting-in-puebla-mexico-10-people-including-a-minor-killed/
दरम्यान, केंद्र शासनाच्या “मत्स्यव्यवसाय आणि जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF)” या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले.
या जेट्टी प्रकल्पामुळे दापोली तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (Nitesh Rane)