Home क्रीडा IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

0
IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी उपस्थित राहणार असल्याची बातमी पाकिस्तानमधील मीडिया देत आहे. पण या वृत्तात तथ्य नाही. ही बातमी खोटी आहे.बीसीसीआयने नकवींना आयपीएलचा कोणताही सामना बघण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही. तसेच आयसीसीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. यामुळे नकवी भारतात येणार की नाही हा प्रश्नच उरत नाही, असे बीसीसीआयने सांगितले.

https://prahaar.in/2026/05/17/krunal-pandya-will-krunal-pandya-be-absent-from-hardiks-wedding-what-is-the-real-reason-behind-the-discussions/

आयसीसीची महत्त्वाची बैठक ३० आणि ३१ मे या दोन दिवसांत होणार आहे. या बैठकीला आयसीसीकडे नोंदणीकृत असलेल्या प्रमुख राष्ट्रीय क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीसाठी कोणत्याही अध्यक्षाला कोणत्याही दुसऱ्या देशात जावे लागणार नाही. यामुळे नकवी भारतात येणार असल्याच्या वृत्तात तथ्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here