Home ब्रेकिंग न्यूज Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

0
Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि मुंबई पोलीस यांना निवेदन देऊन किरीट सोमय्या यांनी ही मागणी केली आहे.

https://prahaar.in/2026/05/17/is-zeeshan-siddiques-mlc-seat-in-jeopardy-due-to-sunetra-pawars-letter/

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि मुंबई पोलीस यांना निवेदन देऊन किरीट सोमय्या यांनी ही मागणी केली आहे. तसेच हिंदूंना धमकावून मनमानी करण्याचा, कायदा धाब्यावर बसण्याचा प्रयत्न झाला तर कुर्बानी देणाऱ्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर दिले जाईल, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

https://prahaar.in/2026/05/17/parth-pawar-meets-chief-minister-fadnavis-developments-in-ncp-accelerate/

महापालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यासंदर्भात मार्गदर्शत तत्वे निश्चित केली आहेत. पण वारंवार या मार्गदर्शत तत्वांचे उल्लंघन होते. अनेक जण सोसायटीच्या अथवा, चाळीच्या आवारात उघड्यावरच कुर्बानी देतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नियम करून त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

https://prahaar.in/2026/05/17/no-manholes-should-be-left-open-bmc/

याआधी सोमय्यांच्या मागणीची दखल घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने कुर्बानी संदर्भात काही मार्गदर्शत तत्वे प्रसिद्ध केली. पण या मार्गदर्शक तत्वांचे अनेकदा उल्लंघन होत असल्यामुळे सोमय्यांनी कडक नियम करून त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

https://prahaar.in/2026/05/17/large-amount-of-waste-generation-commissioner-orders-strict-action-against-those-who-do-not-register-with-the-municipal-corporation/

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना मुंबईतून हाकलून देण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. यानंतर मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये ठिकठिकाणी फेरीवाल्यांविरोधात कारवाई झाली. यामुळे आता कुर्बानी प्रकरणात सोमय्यांच्या मागणीवर बीएमसी आणि पोलीस काय प्रतिसाद देतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here