Home ब्रेकिंग न्यूज मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

0
मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात

मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना आणि बांधकाम, टर्फ यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभाग कार्यालयाने शनिवारी १६ मे २०२६ पासून निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे.यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेडही हटवण्यात आले.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी बैठक झाली. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल तसेच कालिदास नाट्यगृह कामकाजाच्या अनुषंगाने पुनर्रचना आणि सुधार करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परिसरात पाहणी करण्यात आली.

या बैठकीस आणि पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत आमदार मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, नगरसेविका दीपिका घाग, नगरसेविका हेतल गाला – मोरवेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यासह उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.या पाहणी दरम्यान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात काही अनियमितता, तात्पुरत्या संरचना आणि अनधिकृत बांधकामे आढळून आली. त्या संरचना तसेच अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यानुसार शनिवार पासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

‘टी’ विभाग कार्यालयाने शनिवारी सकाळीच क्रीडा संकुलात कारवाई सुरू केली. यात इमारत क्रमांक २ (तथास्तु सभागृह) जवळ असलेले अनधिकृत तात्पुरते शेड आणि शेजारील टर्फ तोडण्यात आले. तसेच इमारत क्रमांक २ च्या बाहेरील बाजूस असलेले २ अतिरिक्त शेड देखील हटवण्यात आले.बॅडमिंटन कोर्ट व सांस्कृतिक सभागृह (इमारत क्रमांक ४) च्या बाहेरील बाजूस फायबर शीट लावून केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले, तसेच इमारतीच्या आत लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्यात आले. टेनिस कोर्टच्या प्रेक्षक गॅलरीवर उभारलेले तात्पुरते शेडही पूर्णपणे हटवण्यात आली.

ही कारवाई करण्यासाठी २५ कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी १ जेसीबी, २ गॅस कटर आणि २ ग्राइंडर या संयंत्रांचा वापर करण्यात आला.महापौरांच्या निर्देशानंतर अवघ्या २४ तासांच्या आत महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली यामुळे क्रीडाप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही ही तोडक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here