Home साप्ताहिक कोलाज निवेदनशैली आणि सूत्रसंचालन

निवेदनशैली आणि सूत्रसंचालन

0
निवेदनशैली आणि सूत्रसंचालन

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

उद्या सुट्टीचा मोसम सुरू आहे. अशा सुट्टीत काय करावं? सर्वांनाच प्रश्न पडला असेल! पण करण्यासारखं खूप काही आहे! करिअरच्या दृष्टीने विचार करता अत्यंत मोठं व्यासपीठ उपलब्ध आहे. सर्वच काही मिळू शकते ते या क्षेत्रामध्ये. अशक्य असे काहीच नसते. नाव, प्रसिद्धी, पैसा, यश, समाधान सारं काही मिळू शकते. त्यासाठी अभ्यास, सराव आणि नियोजन हवे. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यास चिकाटी, जिद्द आणि श्रमाची तयारी हवी.

आज आपण पाहणार आहोत निवेदन शैली व सूत्रसंचालनाचे कौशल्य. मित्र-मैत्रिणींनो उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही हे निश्चित करू शकता. यातून अर्निंग आणि लर्निंग दोन्ही आहे. संधी तर मिळतच असते. विविध प्रकारचे समारंभ, कार्यक्रम, उत्सव, जयंती, पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलने, शष्ठब्दीपूर्ती सोहळे, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, रौप्य महोत्सव, हे सारे साजरे होतच असतात. वर्धापन दिन सोहळे, वाढदिवस, मैफली, संगीत, गीत गायन, काव्य स्पर्धा, विद्यार्थी संमेलन, लग्न विवाह, साखरपुडा, बारसं, मुंज, ओटी भरण अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमातून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात ते निवेदक.

निवेदनशैली ही एक आपली स्वतःची ओळख असते. हातात माईक घेऊन स्टेज गाजवण्याची, प्रसंगानुरूप बोलण्याची, कार्यक्रम रंगतदार करून कार्यक्रमात रंग भरण्याची, एखाद्या धाग्यात पुष्प गुंफावीत हे निवेदक /सूत्रसंचालकाचे काम असते. संयोजकांनी दिलेल्या पत्रिकेतील चार-पाच मान्यवरांच्या नावांना आणि कार्यक्रमांना दर्जेदार उंची प्राप्त करून देण्याची ताकद निवेदकात असली पाहिजे. सजगता, सुलभता, सहजता वावरण्यात असावी.

क्षेत्र कोणतेही असो प्रभावीपणे मनमोहक, आकर्षक, अभ्यासू, अष्टपैलू, संदर्भानुरूप, प्रसंगानुरूप, समय सुचकतेने आणि नम्रपणे निवेदन करावे. सर्वात महत्त्वाचे वेळेचे मोजमाप. कुठेही पाल्हाळ न लावता कार्यक्रमाचे स्वरूप सुंदर घडवावे. श्रोत्रूवर्ग आणि कार्यक्रम यातील दुवा म्हणजे निवेदक. सर्वप्रथम पाहूया निवेदक कसा असावा. निवेदकाने सुंदर, सुहास्य वदनी, स्वच्छ, रसाळ भाषा, सुस्पष्ट, सुवाच्य, अचूक उच्चार, सर्वगुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, आनंदी, तेजस्वी, उत्साही, आकर्षक असावे. आपल्या बोलण्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा, प्रेक्षागृहावर आपला प्रभाव टाकणारा, नेतृत्व आणि वक्तृत्व व्यासपीठ गाजविणारा निवेदक असावा. वाचनाची आवड, यासाठी शब्द संपत्तीचा साठा, ज्याला शब्दांची श्रीमंती म्हणतो ते वेळेवर सुचावेत. समय सुचकतेने, अचूकपणे, दूरदृष्टीने, गुणग्राहकतेने सर्व कार्यक्रम उंचीवर न्यावा. कधी लवचिक, कधी हजरजबाबी असावे. नम्र, साजेशी सर्वप्रथम श्रोते, वेळ, सूचना, वक्ते आणि संयोजक समतोल साधने महत्त्वाचे. साधं सहज सुंदर सच्चेपणा असणारा संदर्भसूची बाळगून मुद्दसूद, शुद्ध, सभ्य प्रसंगी गमतीदार कधी विनोदी बोलणारा. स्पष्ट बोलत असला तरी पण मर्म छेदणारा नसावा. निवेदकाने कुणाच्या व्यंगावर वाईट बोलणारे कधीच नसावे. निवेदन त्रास, क्लेशकारी, ओरडून, भसाडा आवाज कर्णकर्कश्य बोलू नये. कार्यक्रमाची शोभा वाढवावी. शोभा करून घेऊ नये.

इतर कौशल्य आणि गुण कोणते असावेत? आपली स्वतःची शैली, वेगळेपण, लकब हवी. त्यात एक वेगळेपणाचा ठसा उमटावा. विनोद जरी सांगितला तर दुसऱ्यावर न सांगता स्वतःवरती करावा. निवेदनाकडे आपले विचार, मनाशी स्पष्ट, कल्पना व्यक्त करताना दीर्घ श्वास, मोकळेपणाने सुरुवात, स्मितहास्य, नजर भेट, सुस्पष्टता, स्वच्छ मोकळा आवाज, आवाजाची पट्टी, पोत, योग्य वापर, हालचालींचा योग्य वापर करावा. पण कमरेखालील हालचाल जास्त करू नये. कमरेच्या वरील हातवारे चेहऱ्याचे अविर्भाव, हावभाव, देहबोली इ. भावभावना व्यक्त कराव्यात. आवाजाची पट्टी, आवाजाची गती, बोलण्याचा कल, ढब, सुसंगती हवी. श्रोत्यांना विश्वासात घेऊन बोलावे. आपुलकी, मानवता, मैत्री व सहृदयता निर्माण करावी. श्रोत्यांना आपलेसे करून घ्यावे. भीती, संकोच नसावा. पोच राखून बोलावे. मध्येच पॉज घ्यावा. थोडेसे थांबावे. पुन्हा नव्याने सुरुवात करावी. विशेषत: महत्त्वाचे वाक्य, शब्द यापूर्वी लक्ष वेधून घ्यावे. किंचित थांबावे. वाक्यात हवा तेव्हा चढ उतार करावा. आपले बोलणे आणि देहबोली यात सुसंगती असावी. प्रगल्भ विचार, विवेकी आणि सतत विवेक बुद्धी जागृत ठेवावी. चारचौघांसमोर आपण जातो तेव्हा आपले मत प्रामाणिकपणे सच्चेपणाने आणि आत्मविश्वासाने ठासून बोलावे.

सर्वात महत्त्वाचे निवेदकाने किती बोलावे. तर कमीत कमी शब्दांत जास्त सारांश सांगावा. आपण कथन करत असलेल्या गोष्टी थोडक्यात सर्वांसमोर मांडाव्यात आणि त्या खऱ्या असाव्यात. अतिशोयुक्ती टाळावी, सर्वांना प्रबोधनात्मक संदेशात्मक बोलावे, वरचढ वाटेल असे बोलू नये, सहज सुलभ सोपे संवाद साधावेत, तेथे मीपणा नको, शत्रू वर्ग व व्यासपीठ यातील आपण एक एक पुष्पगुंपणार आहोत. निवेदनशैली ही नक्कल नसावी तो एक सुंदर सद्गुण असावा. व्यक्तीपरत्वे भिन्नता जपावी.

समयसूचकता, तत्परता असावी, उत्कट कला, कौशल्याने ठासून भरलेला असा निवेदक असावा. त्याचा आशय ठळक असावा. भलतंच कुठेतरी विषयाला सोडून बोलू नये. अवांतर चर्चा टाळावी. स्वतःवर विनोद चालेल. पण इतरांवर, कुणाच्या व्यंगावर कधीच बोलू नये. राहणीमान साधे, सुंदर, स्वच्छ, फिकट रंगाचे कपडे वापरावेत गडद किंवा भडक रंग वापरू नये, सरळ सुंदर सहज उगवते. कार्यक्रम उंचीवर नेणारे असे निवेदन असावे, कार्यक्रम संपल्यावर जी पोहोचपावती मिळते ते कोणत्याही मोठ्या जड पाकिटापेक्षा भारी आणि न्यारी असते. त्यातच तुमच्या प्रेक्षक मनाचे कान करून ऐकतात. दाद देतात. क्षण क्षण पारखतात. तेव्हा तो कसोटीचा काळ जिंकला की मग पुढची कामे सहजच मिळून जातात. पण हे कौशल्य प्रशिक्षण आसमंत वाईस अॅकॅडमीमार्फत दिले जाते. मुंबई, दादर, वडाळा येथे मी स्वतः ३१ वर्षे निवेदन क्षेत्रात मंत्रालय,पत्रकार संघ, बीएमसी, टीएमसी, टीझेडपी, एनसीआरटी पुणे, माविम, कामगार कल्याण केंद्र, विविध पक्षांचे मेळावे, शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांचे. संपूर्ण महाराष्ट्रभर निवेदनाचा अनुभव व गाढा अभ्यास असल्याने स्वतःच्या नोट्स, सिलॅबस बनवले आहे.

सरावाने, नियोजनातून स्वतःला घडवावे. पारंगत होण्यासाठी आसमंत वाईस अॅकॅडमी निश्चित भेट द्या. तीन दिवसात आपण निवेदक घडवतो. कार्यक्रम कोणताही असो कार्यक्रमाचे स्वरूप, आपली भूमिका, जबाबदारी आणि संहिता अत्यंत सुंदररीत्या प्रशिक्षण दिले जाते. जिभेचे व्यायाम, वाक्य, व्याकरण, शब्द उच्चारण, वाचन आणि भाषण यावर भर दिला जातो. प्रामुख्याने सर्वच क्षेत्रांत उपयुक्त ठरलेल्या या कौशल्याचे प्रमाणपत्र, नोट्स आणि संधी प्रात्यक्षिकासह दिले जाते.

काय टाळावे… तर सर्वात महत्त्वाचे निवेदक निर्व्यसनी असावा. कोणताही मोह, छंद, व्यसन असेल तर त्याचे भान आणि कार्यक्रमाची जाण सगळंच मातीमोल होतं. वेळेच्या पूर्वी अर्धा तास कार्यक्रमास्थळी पोहोचावे. कार्यक्रमाविषयी, संयोजकांची, संस्थेची आणि मान्यवर पाहुण्यांची, परिचयाची, माहितीची नोंद आपल्याकडे खात्रीची, विश्वासार्ह, आत्मविश्वासपूर्वक असावी आणि मांडावीत.

कन्फर्म असावी. फापटपसारा, पाल्हाळीक, तोच तोच पणा, पुनरावृत्ती टाळावी किंवा चिडचिड, अाक्रस्थळेपणा, खडूसपणा, रेटून बोलले असे न बोलता कार्यक्रमाचे गांभीर्य पाळावे. वादाचे मुद्दे टाळावेत. संयोजक आयोजकांशी शक्यतो मिळते-जुळते घ्यावे. कार्यक्रम स्थळी श्रोत्रूवर्ग, गट याची नोंद असावी. सामर्थ्य हवे. बोलण्यासाठी शक्ती हवी. युक्ती हवी. बुद्धिचातुर्य हवे. केवळ चार शब्द मांडता येतील इतके नसून सारासार ज्ञान, माहिती, संदर्भ याचे संकलन असावे. रटाळ निरुत्साहीपणा टाळावा.

निवेदनाच्या पायऱ्या असतात, क्रम असतात, रूपरेषा असते त्याची योग्य मांडणी केल्यास अतिशय सुलभरीत्या अभंग, ओवी, सुविचार, संदेश त्याचप्रमाणे बोधकथा मिळालेल्या इवल्याशा वेळेत मांडायच्या, त्याही समयसुचकतेने, तत्परतेने. हीच खुबी महत्त्वाची. मग कार्यक्रमाचे सोनं करणं तुमची किमया कौशल्य म्हणा. हे सर्वस्वी निवेदकाचे श्रेय आणि कार्य आहे. सर्वात महत्त्वाचे दोन वेळा सांगते… प्रोटोकॉल, शिष्टाचार पाळावा. नावे उच्चारताना गडबड, गोंधळ याचं नाव, त्याला आडनाव बदल बरं पद सिद्ध तेही उच्चारण महत्त्वाचे आहे. आणि सहनशीलता संयम राखावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here