Home देश Monsoon in Andaman 2026 : आला रे आला…अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला…अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

0
Monsoon in Andaman 2026 : आला रे आला…अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?
Monsoon in Andaman 2026

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman) वेशीवर येऊन पोहोचला आहे. देशात सध्या उन्हाचा कडाका आणि उष्णतेच्या लाटा जाणवत असतानाच, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेळेपूर्वीच अंदमान आणि निकोबार बेटांवर अधिकृतरीत्या हजेरी लावली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, त्याचे हे वेळेआधीच झालेले आगमन बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांसाठीच एक मोठा दिलासा देणारे ठरले आहे.

केरळ आणि कोकणातील प्रवासाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अत्यंत अनुकूल वातावरणाचा फायदा घेत आपला पुढचा प्रवास वेगवान केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये (Keral) धडकतो. मात्र, यंदा या वाऱ्यांचा वेग पाहता, तब्बल पाच ते सहा दिवस आधीच म्हणजेच २६ मे च्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण राहिल्यास, साधारणतः ६ जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि कोकण किनारपट्टीवर यंदा वेळेआधीच पावसाच्या दमदार सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

https://prahaar.in/2026/05/16/fake-news-alert-dgipr-calls-ola-uber-rapido-shut-report-in-maharashtra-as-misleading/

 मान्सूनचे वेळापत्रक कधी आणि कुठे?

अंदमान आणि निकोबार बेटे : १६ मेला दाखल झाला

केरळ किनारपट्टी : २६ मे (संभाव्य अंदाज)

महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : ६ जून (संभाव्य अंदाज)

हवामान विभागाचा दुजोरा आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गुड न्यूज’

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पुणे केंद्राने मान्सूनच्या या वेगवान वाटचालीला अधिकृत दुजोरा दिला आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मान्सूनने आपल्या निर्धारित सरासरी तारखेच्या तब्बल ६ दिवस आधीच अंदमानमध्ये प्रवेश केला आहे. ही देशाच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी मानली जात आहे. तसेच, केरळमध्येही तो सरासरीच्या ४ ते ५ दिवस आधी (२६ मे रोजी) दाखल होईल. मान्सूनच्या या वेळेपूर्वीच्या आगमनामुळे देशभरात यंदा खरीपाच्या पेरण्या वेळेवर आणि योग्य प्रकारे होण्यास मोठी मदत होईल, अशी आशा कृषी तज्ज्ञ आणि हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here