Home ब्रेकिंग न्यूज Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई – पुणे वाहतूक विस्कळीत

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई – पुणे वाहतूक विस्कळीत

0
Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई – पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास वेगवान झाला आहे. पण शुक्रवार १५ मे रोजी मिसिंग लिंक परिसरात तीन तासांत दोन अपघात झाले. या अपघातांमुळे एक्सप्रेस वे वरील मुंबई – पुणे दरम्यानच्या वाहतुकीचा वेग मंदावला.

https://prahaar.in/2026/05/15/mastermind-arrested-in-pune-in-connection-with-the-neet-ug-2026-paper-leak-case/#google_vignette

पहिल्या अपघातात टँकर उलटला तर दुसऱ्या अपघातात त्याच ठिकाणी एका भरधाव खासगी बसने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या लागोपाठ झालेल्या दोन अपघातांमुळे एक्सप्रेस वे वरील मुंबई – पुणे दरम्यानची वाहतूक मंदावली. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

https://prahaar.in/2026/05/15/neet-exam-will-be-conducted-through-computer-based-test-cbt-mode-from-next-year/

संध्याकाळी मिसिंग लिंक परिसरात दोन ट्रक एक कंटेनर यांचा अपघात झाला. अवजड वाहने उलटली. ही घटना ताजी असतानाच त्याच भागात काही वेळानंतर एका खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने भरधाव बसद्वारे चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण काही प्रवासी जखमी झाले.

https://prahaar.in/2026/05/15/dharmendra-pradhan-says-neet-exam-fees-will-be-refunded-to-students-no-fee-will-be-charged-for-the-rexamination-and-an-option-to-select-a-city-will-be-provided/

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण तीन तासांत दोन अपघात झाल्यामुळे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अपघात प्रकरणी सर्व वाहनांची तसेच ज्या भागात अपघात झाला तिथल्या रस्त्याची तपासणी केली जाणार आहे. आधी गेलेल्या एखाद्या वाहनातून काही गळती झाल्यामुळे अपघात झाला का याचाही तपास सुरू आहे. अपघाताचे कारण तांत्रिक होते की चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत होता हे तपासातून पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here