Balen Shah : बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान आहे. जेनझीने आंदोलन करत नेपाळचे आधीचे सरकार उलथवून लावले होते. त्यानंतर बालेन शाह हे सत्तेवर आले. सत्तेवर आल्यांनतर शाह यांनी मोठे निर्णय घेतले. या निर्णयांची चर्चा संपूर्ण जगात चालली. बालेन शाह (Balen Shah ) यांनी पंतप्रधान होताच नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी शेजारील राष्ट्रांसोबत समान व्यवहार केला जाईल अशी घोषणा केली होती. तसेच भारत (India) आणि चीनसोबत (China) व्यवहार करताना कोणालाही झुकतं माप दिलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र पहायला मिळतंय. बालेन शाह (Balen Shah ) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/14/neet-paper-nashik-connection-shubhams-elder-brother-is-also-on-the-police-radar/
100 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंवर कर
बालेन शाह यांनी काही दिवसांपूर्वी भारतामधून नेपाळामध्ये येणाऱ्या वस्तुंवर कर लावण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील व्यापार संकटात सापडला आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंवर कर (tax) लावला जात आहे, त्यामुळे भारतामधून वस्तू खरेदी करून नेपाळला विक्री करणारे व्यापारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नेपाळच्या सीमावर्ती भागातील व्यापाऱ्यांनी बालेन शाह (Balen Shah ) यांच्याकडे तक्रार केली होती, की नेपाळमधील ग्राहक हे थेट भारतीय बाजारपेठेतून सामान खरेदी करतात, त्यामुळे आमचं नुकसान होत आहे, त्यानंतर बालेन शाह यांनी शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.
https://prahaar.in/2026/05/14/shri-ganesha-to-purify-voter-lists-in-the-state-from-june-30/
बालेन शाहाचा भारताला पुन्हा मोठा झटका
दरम्यान, आता भारतामधून नेपाळमध्ये (Nepal) जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या चालकाला आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. चालकांना नव्या व्यवस्थेनुसार क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. तसेच अस्थायी वाहन प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया खूपच किचकट असल्यामुळे आता नेपाळला जाणं देखील अवघड झालं आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना बसत आहे.
यासंदर्भात माहिती देताना एका व्यावसायिकाने सांगितलं की, नेपाळच्या या नव्या नियमांमुळे भारत (India) आणि नेपाळमधील व्यापार पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसेच नेपाळमध्ये भारतातून जे पर्यटक जात आहेत, त्यांच्या नोंदणीसाठी देखील आता काही जाचक नियम बनवण्यात आले आहेत, ज्याचा फटका हा पर्यटनाला बसण्याची शक्यता आहे.