Home ब्रेकिंग न्यूज CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल

0
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल
CM Bike ride

मुंबई : जागतिक इंधन संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या ‘काटकसरी’च्या मंत्राची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुरू केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री चक्क ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ या दुचाकीवरून (बुलेट) विधानभवनात दाखल झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरक्षित ताफ्यातील आलिशान गाड्यांना फाटा देत थेट बुलेटवरून एन्ट्री केल्याने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये त्याची मोठी चर्चा रंगली.

https://prahaar.in/2026/05/14/power-generation-at-deonar-ahead-of-diwali-municipal-commissioner-ashwini-bhide-conducts-review/

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हेदेखील दुचाकीवरून मुख्यमंत्र्यांसोबत विधानभवनात पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अंगरक्षक आणि पोलिसांचा ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट परिधान करून आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करत हा प्रवास पूर्ण केला.

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आता निम्म्यावर आणण्यात आली आहे. तसेच, मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अनावश्यक परदेश दौऱ्यांवरही तत्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साधेपणातून सकारात्मक संदेश

सध्या अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी महागड्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करीत असताना, मुख्यमंत्र्यांनी दुचाकीचा वापर करून साधेपणाचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे प्रवास केल्याने सामान्य नागरिकांमध्ये इंधन बचतीबाबत आणि जागतिक संकटाच्या काळात जबाबदारीने वागण्याबाबत सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here