Home क्रीडा IPL RCB vs KKR : विराटचा ‘विराट’ अवतार! कोहलीच्या झंझावाती शतकाने आरसीबीचा केकेआरवर ऐतिहासिक विजय

RCB vs KKR : विराटचा ‘विराट’ अवतार! कोहलीच्या झंझावाती शतकाने आरसीबीचा केकेआरवर ऐतिहासिक विजय

0
RCB vs KKR : विराटचा ‘विराट’ अवतार! कोहलीच्या झंझावाती शतकाने आरसीबीचा केकेआरवर ऐतिहासिक विजय
Virat Kohali (2)

आयपीएल २०२६ च्या ५७ व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना खऱ्या अर्थाने ‘किंग कोहली’ नावाचे वादळ पाहायला मिळाले. अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohali) याने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत एक नाबाद आणि अत्यंत विस्फोटक शतकी खेळी साकारली. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा धुव्वा उडवला. आरसीबीने केवळ सामनाच जिंकला नाही, तर या हंगामातील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

https://prahaar.in/2026/05/13/find-out-how-much-amul-and-mother-dairy-milk-prices-have-increased/

रघुवंशी-रिंकूची झुंज

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित २० षटकांत आरसीबीसमोर १९३ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. केकेआरच्या डावाला आकार देण्याचे काम तरुण फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि आक्रमक रिंकू सिंह यांनी केले. या दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात फटकेबाजी केली, ज्यामुळे केकेआरला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. मात्र, ही धावसंख्या विराटच्या इराद्यांसमोर अपुरी ठरेल, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नसेल.

५ चेंडू राखून आरसीबीचा शानदार विजय

१९३ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात आणि शेवट दोन्ही विराट कोहलीच्या नावावर राहिले. आरसीबीने हे कठीण वाटणारे लक्ष्य १९.१ षटकांत ४ बाद १९४ धावा करून सहज पूर्ण केले. ५ चेंडू राखून आणि ६ गडी राखून मिळवलेला हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरला. अत्यंत संयमी पण आक्रमक पद्धतीने विराटने डावाचे सूत्रे आपल्या हातात ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here