Home देश Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

0
Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

शनीभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शनी शिंगणापूर येथील शनि मंदिर आता 19 मे पर्यंत तब्बल 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री शनैश्वर जयंती आणि शनी अमावस्या यात्रेनिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 13 मे ते 19 मे दरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Shani Shingnapur)

https://prahaar.in/2026/05/13/the-number-of-vehicles-in-the-convoy-of-all-ministers-including-the-chief-minister-has-been-halved/

विशेष म्हणजे ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून भविष्यात कायमस्वरूपी 24 तास दर्शन सुरू ठेवण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त, वाहनतळ, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि विद्युत व्यवस्थेचं विशेष नियोजन करण्यात आलं आहे. 19 मे पर्यंत २४ तास मंदिर उघडे राहत असल्याने  शनी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://prahaar.in/2026/05/13/nashik-emblem-of-nashik-trimbakeshwar-simhastha-kumbh-mela-unveiled/

श्री शनैश्वर जयंती व शनी अमावस्या यात्रेनिमित्त 13 ते 19 मे या कालावधीत शनि मंदिर 24 तास सुरू ठेवण्यात येणार असून देवस्थानच्या विभाग प्रमुखांना त्याची तयारी करण्याचे लेखी आदेश शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here