Home ब्रेकिंग न्यूज NCP’s new executive committee : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळांचे नाव गायब?

NCP’s new executive committee : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळांचे नाव गायब?

0
NCP’s new executive committee : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळांचे नाव गायब?
NCP's new executive committee

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीबाबतचे त्यांचे नवे पत्र व्हायरल झाले असून, त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांचे नाव गायब असल्याचे समोर आले आहे. मात्र, हे पत्र व्हायरल होताच पक्षात मोठी धावपळ सुरू झाली असून, ही निव्वळ ‘तांत्रिक चूक’ असल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.

https://prahaar.in/2026/05/12/the-municipal-corporation-washes-its-hands-of-the-ban-on-packaging-for-crispy-snacks/

राष्ट्रवादी काँग्रेसने २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला नवीन कार्यकारिणीची यादी दिल्याचे एक पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख असून, जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, पक्षाचा मुख्य चेहरा असलेल्या प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नावे या यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सोशल मीडियावर हे पत्र वाऱ्यासारखे पसरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. “माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक आणि कारकुनी चूक झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणामुळे तूर्तास या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी इतक्या महत्त्वाच्या पत्रात एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे.

https://prahaar.in/2026/05/12/nstall-shop-signboards-in-marathi-within-one-month-or-else/

पार्थ आणि जय यांच्यावर मोठी जबाबदारी

व्हायरल झालेल्या यादीत पार्थ आणि जय पवार या युवा नेतृत्वाला महत्त्वाची पदे दिल्याचे दिसत असल्याने, भविष्यात पक्षाची धुरा नवीन पिढीकडे सोपवण्याची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आता सुधारित यादीत कोणाला स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here