Nashik : नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील आडगाव शिवारातील (Aadgaon Area) धात्रक फाटा येथे एका २३ वर्षीय कंपनी कामगाराने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन युवकाने आपली जीवनयात्रा संपविली. पियूष सुनील सूर्यवंशी (सध्या रा. विद्यानगर को-ऑप. हाउसिंग सोसायटी, जत्रा हॉटेलजवळ, धात्रक फाटा, मूळ रा. मालेगाव) असे मृताचे नाव आहे. तो अवघ्या २३ वर्षांचा होता. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पियूषने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
https://prahaar.in/2026/05/11/nida-khans-problems-increase-judicial-custody-for-so-many-days/
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पियूष हा बेडरूममध्ये होता. याच दरम्यान त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही बाब नातेवाइकांच्या लक्षात आली. पियूष बेशुद्ध आढळून आल्याने त्याचे मावस भाऊ रोहित निंबा जाधव यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात डॉ. ठाकरे यांनी घोषित केले. यावेळी माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी (Aadgaon Police) रुग्णालयात धाव घेतली.
https://prahaar.in/2026/05/11/nashik-news-case-registered-against-former-mayor/
पोलिसांनी (Police) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पियूष व्यसनाच्या आहारी गेला होता आणि त्यातूनच आलेल्या नैराश्यात त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. हवालदार एच. डी. देवरे अधिक तपास करत आहेत. मात्र अवघ्या २३ वर्षाच्या पियुषने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.