Home देश Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

0
Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक
actor bharat kant

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमधील आउटर रिंग रोड (ORR) वर त्याच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत भरतसोबत प्रवास करणारा त्याचा मित्र साई त्रिलोक (Sai Trilok) याचाही जागीच मृत्यू झाला. भरत कांत अवघ्या ३१ वर्षांचा होता.

कसा झाला अपघात ?

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात उशिरा रात्री तेलंगणातील आदिबाटला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आउटर रिंग रोडवरील एक्झिट क्रमांक १२ जवळ झाला. भरत आणि साई त्रिलोक प्रवास करत असताना त्यांच्या कारने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, आणि पोस्टमॉर्टेमसाठी त्यांनी त्या दोघांचे मृतदेह रुग्णालयात नेले.

https://prahaar.in/2026/05/11/share-market-signs-of-weakness-in-global-markets-mixed-trading-in-asian-markets/

आदिबाटला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. भारत आणि साईच्या कारचा वेग जास्त असल्याची पोलिसांकडून प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तेलुगू मनोरंजन विश्वात शोककळा :

भरत कांतच्या निधनामुळे तेलुगू मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेत्री आणि भरतची जवळची मैत्रीण आशु रेड्डी (Ashu Reddy) हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत भरतला श्रद्धांजली वाहिली आहे. “माझा सर्वात जवळचा मित्र, माझं कुटुंब आज कायमचं निघून गेलं,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://prahaar.in/2026/05/11/murder-of-cm-suvendu-adhikaris-close-aide-solved-3-accused-apprehended-a-single-upi-payment-led-to-the-breakthrough/

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashu Reddy❤️ (@ashu_uuu)

कोण आहे भरत कांत ?

भरत कांत हा अभिनेता असण्यासोबतच लोकप्रिय कंटेंट क्रिएटरही होता. इंस्टाग्रामवर त्याचे जवळपास ४० हजार फॉलोअर्स तर यूट्यूबवर सुमारे ३० हजार सबस्क्राइबर्स होते. त्याने ग्रामम (Gramam), टेनंट यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तसेच गीतांजली आणि ‘पार्वती परमेश्वरलू’ या वेब सिरीजमधूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here