Home महाराष्ट्र कोकण Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

0
Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी तालुक्यात फारसा पाऊस पडला नव्हता. आज रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अर्ध्या तासात खूप पाऊस पडला. पाऊस पडण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा वावटळीसारखा आला. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. दुकानदार, रस्त्यावरचे भाजीविक्रेते आणि वाहनचालक अशा सर्वांचीच तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हा सलग तिसरा दिवस आहे. वाढलेला उकाडा कमी व्हायला या पावसामुळे हातभार लागला; मात्र आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

https://prahaar.in/2026/05/02/hsc-rajapur-result-2026-rajapurs-brilliant-performance-the-tradition-of-white-success-continues/

संगमेश्वर तालुक्यात आज अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आजच्या पावसामुळे संगमेश्वरला येणाऱ्या दोन मुख्य वीजवाहिन्यांमधून होणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी खांब पडले असून, ताराही तुटल्या आहेत. महावितरणकडून तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बिघाडाची व्याप्ती पाहता वीजपुरवठा लवकर सुरळित होण्याची शक्यता कमी आहे.

प्रचंड मोठ्या वादळ वाऱ्यामुळे संगमेश्वर उपकेंद्राला येणारी 33 केव्ही निवळी व 33 केवी आरवली या दोन्ही लाइन बंद पडलेल्या आहेत. आरवली लाइनचा दोष सापडला असून तेथे कामाची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे खांब मोडून पडलेले आहेत. तसेच तारादेखील तुटलेल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here