Home क्रीडा Axar Patel : दिल्लीचा कर्णधार बदलणार, अक्षर पटेलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, केएल राहुलबाबत विचार

Axar Patel : दिल्लीचा कर्णधार बदलणार, अक्षर पटेलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, केएल राहुलबाबत विचार

0
Axar Patel : दिल्लीचा कर्णधार बदलणार, अक्षर पटेलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, केएल राहुलबाबत विचार

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधून जवळपास बाहेर झाली आहे. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. हे तिन्ही सामने जिंकले तरी दिल्लीचे १४ गुण होतील पण एवढी मजल मारून प्लेऑफ गाठणे अशक्य आहे. यामुळे विजेतेपदासाठी दिल्लीला पुढल्या वर्षी नव्या जोमाने प्रयत्न करावे लागतील. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या खराब कामगिरीवरून कॅप्टन अक्षर पटेलवर टीका होऊ लागली आहे.

यंदाच्या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीने ११ पैकी फक्त चार सामने जिंकले आहेत. तब्बल सात सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून अक्षर पटेलने घेतलेल्या निर्णयांवर टीका होत आहे. फलंदाजीवेळी आशुतोष आणि डेव्हिड मिलरच्या क्रमांकात सतत बदल करणे दिल्लीला भोवल्याचे मत क्रिकेविश्वातून व्यक्त होत आहे. अती प्रयोगांमुळे दिल्लीच्या फलंदाजीचे संतुलन बिघडले. अक्षरने तर ११ सामन्यांत फक्त ४४ धावा केल्या. या अपयशाचाही दिल्लीला फटका बसल्याची चर्चा आहे.गोलंदाजीत अक्षरने ११ सामन्यांत १० विकेट घेतल्या. तो दिल्लीसाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला. पण हा अपवाद वगळता अक्षरच्या नेतृत्वात दिल्ली अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरली.

https://prahaar.in/2026/05/09/vaibhav-sooryavanshi-vaibhav-dominates-among-ipl-legends-now-pollard-has-a-chance-to-break-the-record/

दिल्लीचा नवीन कर्णधार कोण ?

अक्षरच्या वाईट कामगिरीमुळे दिल्लीच्या कर्णधारपदाच्या रेसमध्ये केएल राहुलचे नाव सर्वात पुढे आहे. त्याला कॅप्टनसी (नेतृत्व) करण्याचा अनुभव आहे. याआधी त्याने पंजाब आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात लखनऊ २०२३ च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचली होती. केएल राहुल सध्या फॉर्मात दिसत आहे. दिल्लीसाठी त्याने या हंगामात सर्वाधिक ४६८ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत पुढील हंगामात त्याला कर्णधार पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here