फिफा वर्ल्ड कप २०२६ (2026 FIFA World Cup) च्या उद्घाटन सोहळ्याची रंगत आता अधिकच वाढली आहे. जागतिक पॉप स्टार केटी पेरी (Katy Perry) हिने २०२६ फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय शकिरा (Shakira) हिच्या पुनरागमनामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
१२ जून २०२६ रोजी सोफी स्टेडियम (SoFi Stadium) येथे होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात केटी पेरी आपली कला सादर करणार आहे. याच दिवशी अमेरिका (United States) आणि पॅराग्वे (Paraguay) यांच्यात स्पर्धेचा उद्घाटन सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे फुटबॉल आणि संगीतप्रेमींसाठी हा दिवस खास ठरणार आहे.
https://prahaar.in/2026/05/09/vaibhav-sooryavanshi-vaibhav-dominates-among-ipl-legends-now-pollard-has-a-chance-to-break-the-record/
केटी पेरीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बातमीला दुजोरा दिला. “२०२६ फिफा विश्वचषक उद्घाटन सोहळ्याचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्साह व्यक्त केला आहे.
शकीराचं दमदार पुनरागमन :
या गाण्यात नायजेरियन संगीत स्टार बर्ना बॉय (Burna Boy) देखील सहभागी असणार आहे. त्यामुळे या गाण्याबद्दल संगीतविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांचा जलवा :
उद्घाटन सोहळ्यात केवळ केटी पेरी आणि शकीराच नव्हे, तर अनेक जागतिक कलाकारही रंगत वाढवणार आहेत. यामध्ये फ्युचर (Future), कोरियन पॉप स्टार लिसा (Lisa) यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे.
https://prahaar.in/2026/05/09/italian-open-2026-serbias-novak-djokovic-suffers-shock-defeat/
तर ११ जून रोजी मेक्सिको सिटी (Mexico City) येथे होणाऱ्या कार्यक्रमात जे बाल्विन, बेलिंडा, अलेजांद्रो फर्नांडीझ आणि लोकप्रिय बँड Maná सादरीकरण करणार आहेत.
आतापर्यंतचा सर्वात मोठा FIFA World Cup :
२०२६ चा फिफा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे. ही स्पर्धा ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे.