Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र आहे. एकाबाजूला हैराण करून सोडणारा उकाडा तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस. राज्यात पुढील आठवड्यात 14 मे ते 20 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा राज्याला बसेल. या आठवड्याच्या अखेरीस काही भागात पावसाचे आगमन झाले असून तर पुढील आठवड्यात इतर भागात मुसळधार पाऊस राज्याला झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील अनेक भागात गारपीट होण्याचीही दाट शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानुसार, कोकण क्षेत्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण वारे वाहतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
https://prahaar.in/2026/05/09/gold-price-falls-what-is-todays-price/
हवामान विभागाने धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील काही पट्ट्यात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यात वेगवान वारे वाहतील. विजांचा कडकडाट होईल. तर गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/09/action-by-state-govt-electrical-inspector-who-distributed-bogus-licenses-gets-shock-of-suspension/
रत्नागिरी मध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचे सावट आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लागली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाली.