Home महत्वाची बातमी Minister Nitesh Rane : हिंदूराष्ट्रात साधू-संतांबद्दल अपशब्द उच्चारल्यास शाईफेक होणारच!

Minister Nitesh Rane : हिंदूराष्ट्रात साधू-संतांबद्दल अपशब्द उच्चारल्यास शाईफेक होणारच!

0
Minister Nitesh Rane : हिंदूराष्ट्रात साधू-संतांबद्दल अपशब्द उच्चारल्यास शाईफेक होणारच!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; ‘बापू अभिमान आहे!’ म्हणत संग्राम भंडारे यांना दर्शवला पाठिंबा

मुंबई : ” हिंदूराष्ट्रात राहून साधू-संतांबद्दल खालच्या पातळीवर टीका होत असेल, तर शाईफेकीचे कार्यक्रम अपेक्षितच आहेत,” अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकी प्रकरणी दिली. तसेच ‘ये तो सिर्फ झाँकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है,’ असा इशाराही त्यांनी दिला.

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथे कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना, मंत्री नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “लवांडे यांनी आमच्या साधू-संतांबद्दल आणि हिंदू धर्मातील महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले, त्यामुळे हिंदू समाजात चीड निर्माण होणे स्वाभाविक आहे. लवांडे यांनी आपले थोबाड बंद ठेवायला हवे होते,” अशा बोचऱ्या शब्दांत राणे यांनी प्रहार केला.

https://prahaar.in/2026/05/09/ipl-ticket-black-marketing-racket-busted/

आम्ही सर्व हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहोत. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा भाजप हे पक्ष नंतर येतात, मुळात आम्ही सर्व हिंदू आहोत, असे नितेश राणे म्हणाले. हिंदू समाजाला एकत्र आणणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण तसेच व्यक्ती निर्माणाचा जो प्रवास सुरू आहे, त्याबाबत माहिती देण्यासाठी मी गावोगावी जात आहे. हिंदू राष्ट्र भक्कम करण्यासाठी साधू-संतांचे मार्गदर्शन सकारात्मकतेने घेण्याची गरज आहे”, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here