Home ब्रेकिंग न्यूज Nagpur Crime : २१ वर्षीय सावत्र मुलाने २६ वर्षीय सावत्र आईवर नको नको ते केलं अन्…नागपुरात नात्याला काळिमा!

Nagpur Crime : २१ वर्षीय सावत्र मुलाने २६ वर्षीय सावत्र आईवर नको नको ते केलं अन्…नागपुरात नात्याला काळिमा!

0
Nagpur Crime : २१ वर्षीय सावत्र मुलाने २६ वर्षीय सावत्र आईवर नको नको ते केलं अन्…नागपुरात नात्याला काळिमा!
Nagpur News

नागपूर : नागपूर शहरातून (Nagpur News) माणुसकीला आणि पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या २६ वर्षीय सावत्र आईवरच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारामुळे पीडित महिला तब्बल चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. अक्षत विकास श्रीवास्तव (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

https://prahaar.in/2026/05/08/maharashtra-approves-phase-1-of-14-lane-virar-alibaug-multi-modal-corridor-all-about-the-31793-crore-mega-project/

कसा झाला विवाह?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, २६ वर्षीय पीडित महिलेची आणि आरोपीचे वडील विकास श्रीवास्तव यांची २०२४ मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. विकास श्रीवास्तव हे एका बँकेत नोकरीला आहेत. सुरुवातीला झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी लग्न केले. विकास श्रीवास्तव यांनी केलेल्या या दुसऱ्या लग्नामुळे त्यांचा २१ वर्षीय मुलगा अक्षत अत्यंत संतापलेला होता. त्याने या विवाहाला कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही वडिलांनी लग्न केल्यामुळे त्याच्या मनात या सावत्र आईबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला होता. याच रागातून त्याच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली.

द्वेषातून अत्याचार आणि गर्भधारणा

सावत्र आईबद्दल असलेल्या याच रागातून आणि द्वेषातून आरोपी अक्षतने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याने केलेल्या या दुष्कृत्यामुळे २६ वर्षीय पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती राहिली. हा संपूर्ण प्रकार असह्य झाल्यानंतर आणि सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर, अखेर पीडित महिलेने हिंमत एकवटली आणि थेट मानकापूर पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अक्षत श्रीवास्तव याच्या विरोधात बलात्कारासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपी अक्षतला अटक केली आहे. एका मुलानेच आईसमान असलेल्या सावत्र आईवर केलेल्या या नीच कृत्यामुळे नागपुरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.