Home ब्रेकिंग न्यूज Mayor Ritu Tawade : “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”

Mayor Ritu Tawade : “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”

Mayor Ritu Tawade : “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”
Mayor Ritu Tawade

महापौर रितू तावडे उभ्या राहिल्या कोळी भगिनींच्या पाठीशी

मुंबई : वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.

https://prahaar.in/2026/05/07/maharashtra-weather-alert-weather-patterns-persist-in-maharashtra-alert-issued-for-these-districts-on-thursday/

वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा कथित आरोप करणारे वृत्त विविध प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहे. या अनुषंगाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीगुरुवारी ७ मे २०२६ रोजी सकाळी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन कोळी भगिनींची भेट घेतली. मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/07/bmc-news-inquiry-into-works-on-eastern-and-western-express-highways-over-the-last-three-years/

यावेळी स्थानिक मासळी व्यावसायिकांशीही महापौरांनी संवाद साधला. आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे देखील या कोळी भगिनींनी स्पष्ट केले. जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क करावा, सर्व अडचणींचे निराकरण मी स्वतः करीन, असे महापौरांनी या कोळी भगिनींना आश्वासन दिले.