अजितदादांच्या कामाच्या कार्याला सलाम म्हणून आर्यनसिंह दडियाला या युवकाचा २१० किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम; उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची घेतली भेट आणि दिली माहिती…
मुंबई : कामाचा माणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित म्हणून आर्यनसिंह दडियाला या युवकाने २१० किलोमीटरचा महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच असा खुल्या समुद्रातील दोन-मार्गी (टू-वे) एकल (सोलो) मॅरेथॉन पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. दरम्यान यासंदर्भात आज आर्यनने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली.
४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद असा २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ यादरम्यान अखंड पोहण्याचा पराक्रम आर्यनसिंह दडियाला याने केला.
https://prahaar.in/2026/05/06/pm-vishwakarma-yojana-have-you-heard-modi-government-is-giving-3-lakh-rupees-but-for-what-what-is-the-governments-plan-find-out/
महाराष्ट्राच्या जनतेसाठी दादा नेहमीच मेहनत घेत होते.दिवसरात्र दादांनी विकासकार्याला वाहून घेतले होते त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आर्यनने देशासाठी अखंड पोहण्याचा निर्धार पूर्ण केला.
https://prahaar.in/2026/05/06/vietnamese-president-to-lam-vietnams-president-to-lam-met-prime-minister-modi-at-hyderabad-house/
काळोख्या रात्री, प्रचंड वारे, पाण्याखालील प्रवाह, दर ६ तासांनी बदलणाऱ्या भरती-ओहोटी आणि जेलीफिशच्या दंशांमध्येही तो आर्यन खंबीरपणे पोहत राहिला.