गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक स्तरावर चर्चेत असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ (Marco Rubio) यांनी अधिकृतपणे जाहीर केले की, इस्रायलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ आता पूर्णपणे संपवण्यात आले आहे. या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/05/06/us-consulate-in-peshawar-us-to-close-consulate-in-peshawar-pakistan/
जरी ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ संपले असले तरी मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. विशेषतः Strait of Hormuz परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. मार्को रुबियो यांनी सांगितले की, ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अंतर्गत अमेरिकन नौदल या महत्त्वाच्या समुद्री मार्गातील सुरुंग हटवून जहाजांची वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे. तसेच इराणकडून बेकायदेशीरपणे आकारला जाणारा टोल थांबवण्यासाठीही अमेरिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/05/06/share-market-positive-signals-from-global-markets-asian-markets-also-bullish-trend/
दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन (Masoud Pezeshkian) यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. “एकीकडे चर्चा करण्याची भाषा आणि दुसरीकडे लष्करी दबाव, हे दुटप्पी धोरण आहे,” असे म्हणत त्यांनी अमेरिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या पार्श्वभूमीवर, जरी संघर्ष तात्पुरता थांबला असला तरी भविष्यातील परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.