– ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉकच्या बांधकामांमध्ये आणखी ५४ झाडे बाधित
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील पवई येथील आयआटी परिसरात मागील काही चार वर्षांत हॉस्टेल, सीओपीटी आदींची कामे करण्यात आली असून सन २०२२पासून या सर्व इमारतींच्या बांधकामांमध्ये बाधित झाडांपैंकी २३७ झाडे कापणे तसेच ४०० झाडे पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना प्रशासक काळामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या ४०० झाडांपैंकी १८२ झाडे मृत पावली आहे तर २०४ झाडेच जगली आहे. त्यात आता आणखीत आणखी एका इमारतीच्या बांधकामांमध्ये २५२ झाडांपैंकी ५४ झाडे बाधित होत असून त्यातील ३१ झाडे कापली जाणार आहेत, तर २३ झाडे पुनर्रोपित केली जाणार असून याबाबतचा प्रस्ताव आता वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/05/06/bmc-news-cleaning-in-municipal-hospitals-through-a-private-company/
https://prahaar.in/2026/05/05/eknath-shinde-the-accused-must-be-hanged-will-demand-the-death-penalty-in-court/