Home देश Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार
Bharat Electronics Limited

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या खरेदीसाठी हैदराबाद येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 1476 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रणालीत 72 टक्के स्वदेशी घटकांचा वापर करण्यात येणार आहे. ‘बाय (इंडियन-इंडिजेनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड)’ या श्रेणीअंतर्गत करण्यात आलेल्या या करारावर 5 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

https://prahaar.in/2026/05/05/scam-worth-rs-45-crore-in-housekeeping-tenders-in-major-bmc-hospitals-proposal-to-be-presented-in-standing-committee-tomorrow/

ही प्रणाली भारतीय लष्कराच्या युनिट्सचे आधुनिकीकरण करेल तसेच देशातील स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेला अधिक बळकट करेल. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन-इंडिया’प्रती असलेली वचनबद्धता अधिक दृढ करतो.

https://prahaar.in/2026/05/05/punjab-government-is-taking-vengeful-action-raghav-chadhas-venomous-criticism-of-punjab-government/