मुंबई : पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सदर प्रकल्प साध्या दर्जाचा न ठेवता देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा असावा. यासाठी सखोल अभ्यास करून सुस्पष्ट व व्यवहार्य आराखडा तयार करावा. शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/05/05/after-the-formation-of-bjp-governments-in-odisha-2024-and-delhi-2025-the-ayushman-bharat-scheme-has-been-implemented-there-now-preparations-for-implementing-this-scheme-in-west-bengal-are-in-t/
या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
पनवेल हे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे या प्रकल्पाद्वारे देश-विदेशातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल. तसेच पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा अभ्यास आणि शैक्षणिक मूल्यवर्धनासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/05/big-news-eds-lookout-notice-against-kolkata-dcp/
बैठकीत प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासास गती देणे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संबंधितांना निर्देश दिले.
या बैठकीस आमदार विक्रांत पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.