Home महाराष्ट्र ठाणे Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
Kalyan

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण एकतरुण एसी लोकलच्या छतावर बसला होता. ही एसी लोकल बदलपूरहून कल्याणच्या दिशेने येत होती. बदलापूरहून येणारी लोकल कल्याण रेल्वे स्थानकात थांबली अन् प्रवासी चढत असताना त्यांचे लक्ष टपावर गेले अन् टपावर बसलेल्या व्यक्तीकडे गेले.

https://prahaar.in/2026/05/05/big-change-in-mumbai-local-new-train-being-tested-in-up/

बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या टपावर मनोरुग्ण तरुण चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान दुपारी सुमारे २:०३ वाजण्याच्या सुमारास एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी संबंधित तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. तो काही वेळ खाली उतरला; मात्र काही वेळाने पुन्हा लोकलच्या टपावर चढला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

https://prahaar.in/2026/05/05/nasrapur-the-child-victim-of-the-nasrapur-incident-died-due-to-asphyxia-what-exactly-is-asphyxia/

यानंतर ट्रेन पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर हमाल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करत सुमारे २:५० वाजता त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले.

यानंतर त्याला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.