न्यू यॉर्क : जगातील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२६’ ४ मे रोजी सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळे आणि हटके फॅशन, आऊटफिट पाहायला मिळत आहेत. मेट गाला २०२६ ची यावर्षीची थीम ‘कॉश्च्युम आर्ट’ आहे आणि ड्रेस कोड ‘फॅशन इज आर्ट’ असा आहे . या थीमनुसार कलाकारांनी कपडे परिधान केले असून इव्हेंट्सला चार चांद लागले आहेत.
भारतामधून या कलाकारांनी घेतला सहभाग
भारतामधून इशा अंबानी, नताशा पुनावाला, मनीष मल्होत्रा, कारण जोहर, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांसारख्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. परंतु दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या इव्हेंट्सचा भाग नसतील अश्या बातम्या समोर आल्या होता. या बातमीवर शिक्कामोर्तब करत प्रियंका आणि दीपिकाने या मेट गाला २०२६ मध्ये उपस्तीथी दर्शवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीच्या चर्चा रंगल्या आहेत.
https://prahaar.in/2026/05/05/ananya-birlas-sizzling-performance-at-the-met-gala-subodh-guptas-masked-look-sets-the-internet-on-fire/
प्रियांका उपस्थित राहू शकली नाही कारण….
सध्या ती ६ मी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सिडाटेल’ च्या आगामी सिजनच्या प्रसिद्दीसाठी एका मोठ्या भागतील पत्रकार दौऱ्यात व्यस्त आहे. त्यानंतर लगेचच ती गोल्ड हौस गालासाठी लॉस एंजेलिसला जाणार आहे, तिथे तिचा ग्लोबल व्हॅनगार्ड पुरस्काराने सन्मान होणार आहे.
https://prahaar.in/2026/05/05/raja-shivaji-dominates-the-box-office-crosses-the-rs-40-crore-mark-in-just-three-days/
दीपिका पदुकोण चित्रपटात व्यस्त
यापूर्वी दीपिका २०१७, २०१८, २०१९ मध्ये मेट गालामध्ये सहभागी झाली होती. परंतु दीपिका सध्या तिच्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त आहे, दीपिकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ती दोन प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. चित्रपट हे तिचे नेहमीचे प्राधान्य राहील आहे आणि पुढेही राहील. ‘किंग’ हा सिनेमा २०२६च्या अखेरीस आणि ‘राका’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याने दोन सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण करणे सध्या तिचे प्राधान्य आहे.