राहुरी : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले.
https://prahaar.in/2026/05/04/baramati-bypoll-election-2026-result-sunetra-pawar-leading-by-26773-votes-in-the-first-round/
पश्चिम बंगाल, आसाम, तमीळनाडू सोबतच बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज म्हणजेच सोमवार ४ मे रोजी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी बारामती येथील गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत पहिला कल आणि दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.
https://prahaar.in/2026/05/04/excitement-surged-among-investors-as-election-trends-began-to-emerge/
https://prahaar.in/2026/05/04/nitesh-rane-secularism-is-a-pest-created-by-congress-minister-nitesh-ranes-attack/
यावरून राज्यातील दोन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुतीचीच सरशी होत असल्याचे चित्र आहे.