मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेले कल बघता भाजपची सर्वच राज्यात आधीच्या तुलनेत चांगली कामगिरी होत असल्याचे दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. यामुळे निफ्टी फिफ्टी २३७.४५ अंकांनी वधारला असून २४,२४३.०० वर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी निफ्टी फिफ्टी २३,९९७.५५ वर बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स ८२४.१६ अंकांनी वधारला असून ७७,७३३.६० वर पोहोचला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ७६,९१३.५० वर बंद झाला होता.
हाँगकाँगचा हँग सेंग १.४ टक्क्यांनी वधारला तर ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० ने घसरला. जपान आणि चीनमधील बाजार ‘गोल्डन वीक’च्या सुट्ट्यांमुळे बंद होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी ३.८ टक्क्यांनी आणि तैवानचा ताईक्स ४.२ टक्क्यांनी वाढला. एस अँड पी ५०० ने उच्चांक गाठला, तर नॅसडॅक आणि इतर निर्देशांकही स्थिर राहिले.
https://prahaar.in/2026/05/03/maruti-suzuki-rise-in-car-sales-in-april-maruti-suzuki-takes-the-lead/
अमेरिकन क्रूड प्रति बॅरल १०१.७४ डॉलरच्या घरात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०८.१९ च्या दराने उपलब्ध आहे. पश्चिम आशियातील युद्धाबाबतची अनिश्चितता कायम आहे.
https://prahaar.in/2026/05/02/indias-gst-revenue-collection-hits-rs-2-43-lakh-crore-in-april/
एप्रिल २०२६ मध्ये निफ्टीने ५.८१ तर सेन्सेक्सने ५.१७ टक्के सरासरी परतावा दिला. ही डिसेंबर २०२३ नंतरची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. एप्रिल महिन्यात जवळपास सर्व प्रमुख कंपन्यांच्या शेअरच्या दरात वाढ झाली. मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्येच नाही तर मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या दरातही वाढ दिसून आली. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये २० तर मिड कॅप इंडेक्समध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिलमध्ये भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५१ ट्रिलियन रुपयांनी वाढून ४६३.३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले. ही आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक वाढ आहे.